शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना दिलासा ! रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:07 IST

सुमारे ५० हजार ‘टीएआयटी’ पात्र उमेदवारांना दिलासा

ठळक मुद्देरखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार 

औरंगाबाद : पवित्र पोर्टलमार्फत ‘ऑनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील एका अंतरिम आदेशामुळे निकाल रखडला होता. मात्र, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी वरील अंतरिम आदेशात दुरुस्ती करून रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश शुक्रवारी (दि.३१) दिला. 

या आदेशामुळे राज्यातील बी. एड. पदवीधारक ‘टीचर्स अ‍ॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५० हजार पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे राज्यातील पवित्र पोर्टलमार्फत ‘आॅनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान होईल. नितीन कचरे या पदवीधारक याचिकाकर्त्याने बी.एड.ला प्रवेश घेतल्यानंतर ‘टीचर्स अ‍ॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) दिली. वास्तविक  ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार बी. एड. पदवीधारक असणे बंधनकारक असताना कचरे यांनी अपूर्ण माहितीआधारे ‘टीएआयटी’ परीक्षा दिली. त्यानंतर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. नोंदणी नाकारल्यामुळे कचरे यांनी अ‍ॅड. शरद नातू मार्फत औरंगाबाद  खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेश देऊन कचरे यांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली. 

३१ जानेवारीला झाला अंतरिम आदेशराज्यातून सुमारे ६५ हजार उमेदवारांनी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता. त्यातील सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले होते. मात्र, खंडपीठाच्या वरील अंतरिम आदेशामुळे भरती प्रक्रिया रखडली होती. ३१ जानेवारी २०२० रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेशात दुरुस्ती केल्यामुळे भरती प्रक्रियेतील सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या वतीने  सहायक सरकारी वकील अतुल काळे तर हस्तक्षेपकाच्या वतीने अ‍ॅड. दिलीप बनकर पाटील यांनी काम पाहिले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद