शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

खरच ! औरंगाबादमध्ये विवाह प्रमाणपत्रासाठी जावे लागते दवाखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 15:34 IST

काही वर्षांपासून मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना  पती- पत्नीचे खरंच लग्न झाले होते काय, हे तपासण्याची जबाबदारी दिली आहे.

ठळक मुद्देविवाह प्रमाणपत्राची आवश्यकता पडल्यास, झोन कार्यालयात अर्ज करावा लागतो.ती फाईल त्या झोनमधील मनपाच्या दवाखान्यात जाते.

औरंगाबाद : तुम्हाला जर विवाह प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला थेट महापालिकेच्या दवाखान्यात जावे लागेल. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे सत्य आहे. रुग्णतपासणी सोडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना  पती-पत्नीची सत्यता पडताळणी करावी लागत आहे. 

काही वर्षांपासून मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना  पती- पत्नीचे खरंच लग्न झाले होते काय, हे तपासण्याची जबाबदारी दिली आहे. यामुळे कोणाला लग्नानंतर काही वर्षांने विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता पडल्यास, झोन कार्यालयात अर्ज करावा लागतो. ती फाईल त्या झोनमधील मनपाच्या दवाखान्यात जाते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याला सत्यता पडताळणीचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व कागदपत्रे, त्या दांपत्याची लग्नपत्रिका, लग्नातील सोबतचे फोटो, ज्याने लग्न लावले त्या पुरोहिताची स्वाक्षरी व दोन साक्षीदार यांची सत्यता पडताळणी करून मगच फाईल मंजूर करतात.   

कर भरला तरच  मिळते प्रमाणपत्रविवाह प्रमाणपत्र असे सहजासहजी मिळत नाही. तुम्ही जर मनपाचा कर म्हणजे मालमत्ता कर, पाणीपट्टी व एनए अकृषीकर       ३१ मार्च २०२१ पर्यंत भरला असेल तरच विवाह प्रमाणपत्र मिळते. 

मनपाकडे नाही एकत्रित माहितीशहरात किती दांपत्यानी विवाह प्रमाणपत्र घेतले याची एकत्रित आकडेवारी मनपाकडे नाही. ९ झोन कार्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांकडे त्याच्या झोनपुरतीच माहिती मिळते. तो जर नवीन बदली होऊन आलेला असेल तर त्याला मागील १० वर्षांतील आकडेवारी शोधण्यास वेळ लागतो.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका