शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या मूर्तींना रेडिमेड वस्त्र...!

By admin | Updated: September 14, 2014 00:11 IST

औरंगाबाद : नवरात्रोत्सव अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

औरंगाबाद : नवरात्रोत्सव अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त देवीच्या मूर्ती तयार करण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत. मूर्तिकारांच्या हातातून देवीची अनेक रूपे साकारले जात आहेत. रेडिमेड वस्त्र घातलेल्या मूर्ती यंदाचे आकर्षण ठरीत आहेत. लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर आता शहरवासीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. मूर्तिकारांनी आता आपले लक्ष देवीच्या मूर्ती तयार करण्याकडे केंद्रित केले आहे. गणेशोत्सवाच्या तुलनेत नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळांची संख्या कमी असते. यामुळे मूर्तिकारही देवीच्या ठराविक मूर्ती तयार करतात. गुजरातहून आलेले मूर्तिकार मोठ्या मूर्ती तयार करीत आहेत. मात्र, स्थानिक मूर्तिकार मध्यम आकारातील मूर्ती तयार करीत आहेत. स्थानिक मूर्तिकारांनी यंदा रेडिमेड वस्त्र घालून मूर्र्तींना आणखी आकर्षक बनविले आहे. गुलाबी, पिवळ्या रंगातील वस्त्रांनी देवीच्या मूर्ती अधिक खुलून दिसत आहेत. दुर्गा मातेच्या विविध मूर्ती दरवर्षी तयार करण्यात येतात. मागील काही वर्षांपासून सरस्वती देवी, कालिका माता, तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, सप्तशृंगी देवीच्या मूर्तीही साकारण्यात येत आहेत. मूर्तिकार नंदकुमार परदेशी यांनी सांगितले की, पूर्वी देवीची मूर्ती आम्ही तयार करीत होतो व भाविक ती खरेदी करून नंतर सुवासिनी त्या मूर्तीला साडी नेसवत. मात्र, आता आम्हीच मूर्तीसोबत साडीसारखे वस्त्र परिधान करून देत आहोत. यामुळे मूर्ती अधिक खुलून दिसत आहेत, अशा वस्त्राने सजविलेल्या मूर्र्तींना किंमतही अधिक मिळत आहे. गणेशोत्सवात सर्वप्रथम लालबागच्या राजाच्या मूर्तीला असे रेडिमेड वस्त्र परिधान करून देण्यास सुरुवात झाली. हा ट्रेंड आता नवरात्रोत्सवात दिसत आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सवात बहुतांश मंडळे दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करतात, तर विविध शाळांमधून सरस्वती देवीची स्थापना केली जाते. मागील काही वर्षांपासून कालिका मातेच्या मूर्तीलाही मागणी वाढली आहे. यामुळे यंदा लहान आकारातील कालिका मातेच्या मूर्ती तयार करण्यात आल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.