गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:37 IST2017-08-25T00:37:34+5:302017-08-25T00:37:34+5:30
गणाधिपतीच्या स्वागतासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. उद्या शुक्रवारी गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे.

गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गणाधिपतीच्या स्वागतासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. उद्या शुक्रवारी गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे. यानिमित्ताने श्रीच्या मूर्तीपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व खरेदीला बाजारपेठेत वेग आला आहे. लाडके दैवत गणपती बाप्पाचे आगमन होणार यामुळे सर्वत्र उत्साह संचारला
आहे.
शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात सकाळी १०.३० वाजता विधीवत ‘श्री’च्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करून शहरातील गणेशोत्सवाला सुरुवात होईल. समर्थनगर येथे जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयात सकाळी १० वाजता ‘श्री’च्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या गजानन महाराज मंदिर चौकातील कार्यालयाचे उद्घाटन व ‘श्री’ची स्थापना दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे.
कार्यालयाचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, सर्व आमदारांची उपस्थिती राहणार आहे.