विकसित होणाऱ्या भागांसाठीचे रेडी रेकनर वाढले

By Admin | Updated: April 4, 2016 00:40 IST2016-04-04T00:17:13+5:302016-04-04T00:40:38+5:30

शिरीष शिंदे , बीड बांधकाम व्यवसायात मंदीचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात ६ टक्के वाढ केली असल्याचे जाहीर केले.

Ready Reckoner for the developing areas | विकसित होणाऱ्या भागांसाठीचे रेडी रेकनर वाढले

विकसित होणाऱ्या भागांसाठीचे रेडी रेकनर वाढले


शिरीष शिंदे , बीड
बांधकाम व्यवसायात मंदीचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात ६ टक्के वाढ केली असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र शहरातील विकसित होणाऱ्या भागांचे रेडी रेकनर दर जवळपास १० ते ११ टक्क्यांनी वाढले असल्याचे बाजार मूल्य दर तक्त्यावरून समोर आले आहे. त्यामुळे घर, फ्लॅट खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरच आहे.
१ एप्रिलपासून नवीन बाजार मूल्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली होती. शासन स्तरावर याचा कायम पाठपुरावा केला गेला. मागणीप्रमाणे नवीन रेडी रेकनर दरामध्ये जुन्या भागामधील रेडी रेकनरनंतर फारसे वाढविले गेले नाहीत. ते दर ६ ते ७ टक्क्यांच्या आसपास आहेत. मात्र, यात शासनाने एक मेख मारली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमधील मोकळ्या जागा आता फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरालगत असणारे भाग झपाट्याने विकसित होत आहेत. त्या ठिकाणी रो-हाऊसेस, फ्लॅटचे बांधकाम दुष्काळात जोरात सुरू आहे. मुख्य भागामध्ये प्रॉपर्टीचे फारसे व्यवहार होत नाहीत. मात्र विकसित होणाऱ्या भागांमध्ये नियमित व्यवहार सुरू असतात. गुंतवणूक म्हणून फ्लॅट किंवा रो-हाऊस खरेदी करतात. हा धागा पकडत शासनाने शहरालगत असणाऱ्या प्रॉपर्टीचे रेडी रेकनर दहा ते अकरा टक्क्यांच्या जवळपास ठेवले आहेत.
पांगरी रोड ते न.प. हद्द परिसरातील मोकळ्या जागेचे पूर्वीचे दर ८०५० रुपये होते, ते आता ८९०० झाले आहेत. तसेच कॅनॉल रोड म्हणजेच नगर रोड ते शिंदे कॉलनी परिसरानंतर असणाऱ्या मोकळ्या जागेचे दर ११ हजार रुपये, तर निवासी जागांचे दर २२ हजार रुपये आहेत.
मोंढा रस्ता भागातील मोकळ्या जागांचे दर १५२००, तर निवासी जागांचे दर २६ हजार रुपये, शिवाजी पुतळा ते एस.टी. स्टँड परिसर २४७५० हे खुल्या, तर ३५,२०० रुपये निवासी जागांचे दर असे जिल्हा मुद्रांक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस.एच. गोपवाड म्हणाले.

Web Title: Ready Reckoner for the developing areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.