दिवाळीसाठी कापड बाजार सज्ज
By Admin | Updated: October 19, 2014 00:39 IST2014-10-19T00:36:06+5:302014-10-19T00:39:25+5:30
औरंगाबाद : शहरातील कपड्यांची दुकाने दिवाळीसाठी सज्ज झाली असून लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि डिझायनिंग कपडे बाजारात दाखल झाले आहेत.

दिवाळीसाठी कापड बाजार सज्ज
औरंगाबाद : शहरातील कपड्यांची दुकाने दिवाळीसाठी सज्ज झाली असून लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि डिझायनिंग कपडे बाजारात दाखल झाले आहेत. खास महिलांसाठी नवीन साड्या बाजारात आल्या असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी महिलांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत.
दिवाळीसाठी शहरातील लहान- मोठ्या कापड दुकानदारांनी मागील दोन महिन्यांपासूनच खरेदीला सुरुवात केली असून ग्राहकांची मागणी आणि आवड लक्षात घेऊन त्यांनी आकर्षक आणि नक्षीदार साड्या आणल्या आहेत.
दिवाळी झाल्यानंतर लगेचच विवाहाचा मुहूर्त असल्याने यावर्षी सर्वात जास्त कापड खरेदी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी
सांगितले.
टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्रींनी घातलेल्या विविधरंगी आणि डिझायनिंग साड्यांना महिलांची पसंती आहे. नवीन फॅशननुसार शॉर्ट शर्टला सर्वाधिक मागणी असल्याने त्यात नवनवीन प्रिंटेड, प्लेन, डिझायनिंग शर्ट, पंजाबी सूट आणि लहान मुुलांसाठी रेडिमेड ड्रेस आले आहेत.
नवनवीन डिझायनर कपडे
लहान मुलांसाठी नवीन जीन्स पँट, तर पुरुषांकरिता खास खादी स्पेशल कुर्ता पायजामा आणि प्लेन सूट आले आहेत. त्यात जीन्स पँट आणि कॉटन शर्ट आहेत. महिलांसाठी लक्ष्मीपती, लाहोर पंजाबी पाकिस्तानी डिझायनिंग पंजाबी सूट, अनारकली आणि हाफ पॅटर्न शर्ट बाजारात उपलब्ध आहेत.