शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची तहान भागविण्यासाठी श्रीखंड्या होण्यासही तयार - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:15 IST

Uddhav Thackeray, Aurangabad Water Pipeline Scheme गरवारे क्रीडा संकुलावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वात मोठ्या १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे २५ कोटीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहराशी अतूट नाते होते. हे नाते अधिक मजबूत करण्यासाठी मी आलोय. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीखंड्या यांनी आपल्या कावडमधून पाणी आणून पाण्याचा हौद भरला होता. औरंगाबाद शहरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

गरवारे क्रीडा संकुलावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वात मोठ्या १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे, २५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन सुद्धा रिमोट दाबून करण्यात आले. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांची ओळख रिमोट कंट्रोल अशी होती. आज स्मारकासह विविध विकास कामांचे भूमिपूजन सुद्धा रिमोट दाबून करण्यात आले. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. लवकरच गुळगुळीत रस्ते औरंगाबादकरांना मिळतील. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम बघण्यासाठी मी न सांगता येईल. समृद्धी महामार्गाचे काम हे अचानक पद्धतीने बघितले. कितीही केले तर मी औरंगाबादकरांचे ऋण फेडू शकत नाही असेही शेवटी त्यांनी सांगितले. कार्यक्रमास आ. संजय शिरसाट, अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, सतीश चव्हाण, प्रदीप जयस्वाल, अतुल सावे, विनोद घोसाळकर, मिलिंद नार्वेकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर तर आभार अंबादास दानवे यांनी मानले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादWaterपाणी