रिडींग विनाच बिले !
By Admin | Updated: March 28, 2015 00:46 IST2015-03-28T00:13:40+5:302015-03-28T00:46:37+5:30
राजेश खराडे , बीड महावितरण कंपनीने ग्राहकांच्या विद्युत बील वाटपाचे खाजगीकरण केले आहे. कत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील जवळपास सहा ते आठ हजार ग्राहकांना बीलच मिळत नाही

रिडींग विनाच बिले !
राजेश खराडे , बीड
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या विद्युत बील वाटपाचे खाजगीकरण केले आहे. कत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील जवळपास सहा ते आठ हजार ग्राहकांना बीलच मिळत नाही. प्रत्यक्षात मीटरचे रिडींग न घेताच अंदाजानेच बीले वाटपाचा सपाटा सध्या शहरात सुरू आहे. त्यामुळे मोमीनपुरा, माळीवेस, बालेपिर आदी भागातील ग्राहकांना रिडींगविनाच घेतलेल्या बिलाचा भरणा करावा लागत आहे. ‘लोकमत‘ने शुक्रवारी विद्युत रिडींगच्या संदर्भाने सर्वेक्षण केले, त्यातून हा प्रकार पुढे आला.
बीड विभागामध्ये ३६ हजार ग्राहकआहेत. मात्र महिन्याकाठी विद्युत बील भरणा करणाऱ्यांची संख्या तोडकी आहे. त्यातच चुकीचे बील किंवा बीलच मिळत नसल्याची सबब पुढे करीत ग्राहक बील भरण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी महावितरणच्या थकबाकीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात चार कंत्राटदारांना वीज ग्राहकांना पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. प्रत्येक कंत्राटादाराकडे १० ते १५ कामगार असून बिले अदा करण्याचे काम करतात. मात्र ग्राहकांचा पत्ता आढळून न आल्यास हे कर्मचारी मीटरची रिडींग न घेताच अंदाजे पुर्वीच्या बिलाच्या रकमेनुसार बीले अदा करतात. त्यामुळे महावितरणकडे बील दुरूस्तीविषयक सर्वाधिक तक्रारी येत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. दिवसभरात येथील विभागीय कार्यालयात ३० ग्राहक तक्रारी दाखल करतात. पैकी १८ ते २० तक्रारी या बील दुरूस्तीवषियक असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये मीटरवरील रिडींग व प्रत्यक्षात बीलावरील युनिटच्या तुलनेतील रक्कम यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले. बील दुरूस्ती करिता ग्राहक गेले असता केवळ बिलावरच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लिखापडी केली जाते. प्रत्यक्षात महिन्याठी बील जैस थे... येत असल्याने ग्राहकांची बिले अदा करण्याविषयी मानसिकता बदलते. तर दुसरीकडे महावितरणच्या थकबाकीत वाढ होते. असा दुहेरी फटका केवळ कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे बसत आहे. सध्या शहरात व जिल्ह्यात महावितरणची विशेष वसुली मोहीम सूरु आहे. वसुलीकरिता अधिकारी कर्मचारी ग्राकांच्या दारी जाताच विद्युत बील चुकीचे आल्याचे सांगण्यात येते. एकीकडे जिल्ह्यातील ग्राहकांची विजबील अदा करण्याची मानसिकता नाही. यातच विज बिलाविषयी ग्राहकांच्या तक्रारीत वाढच होत आहे. त्यामुळे नियमित अदा करणारे ग्राहकही विज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कंत्राटदारांवर महावितरणचे वर्चस्व असणे गरजेचे आहे. मात्र आर्थिक हीतसंबंध जोपासण्यासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगतच आहे.
विजेचा बेसुमार वापर
आता सोयी- सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे विविध उपकरणे विजेशिवाय चालत नाहीत. परिणामी वीजेचा वापर वाढला आहे. महत्वाचे म्हणजे उन्हाळ्याच दिवस असल्याने पंखे, कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अनेकदा आवश्यकता नसताना ही उपकरणे सुरूच असतात. त्यामुळे वीज वाया जाते. ग्राहकांनी जास्तीची वीज वापरुनही जुन्या बिलाचा आधार घेऊन बिले दिली जातात.
शहरातील बालेपीर, मोमीन पुरा, नालवंडी नाका आदी भागातील ग्राहकांचा पत्ता शोधणे मुश्किल होते. त्यामुळे या भागात बिल वाटप हे केलेच जात नाही. पुर्वीच्या बिलानुसारच चालू बिलाचे आकडे दिले जातात. मीटरचे रिडींग तर घेतलेच जात नसल्याचे दिसून येत आहे. महिन्याकाठी बिलेच पोहच होत नसल्याचे नाळवंडी नाक्यावरील वीज ग्राहकांनी सांगितले.
तक्रारी, अर्जांचा ढिगारा
दिवसाकाठी महावितरण कार्यालयात शेकडो ग्राहकांचे तक्रारीचे अर्ज येतात. आॅनलाईनद्वारे तक्रारी ह्या वेगळ्याच. यामध्ये सर्वाधिक विजबील दुरूस्तीचे अर्ज अधिक असल्याचे दिसून आले. आठ दिवसांच्या आत ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करणे अपेक्षित आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे ग्राहकांना तक्रार देऊनही महावितरण कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.