एकाचवेळी संपूर्ण कुराणाचे वाचन
By Admin | Updated: May 29, 2014 00:23 IST2014-05-29T00:06:28+5:302014-05-29T00:23:26+5:30
हिंगोली : शहरातील पेन्शनपुरा येथील एका विद्यार्थ्याने एकाच वेळी संपूर्ण कुराण वाचन करण्याची किमया केली आहे.
एकाचवेळी संपूर्ण कुराणाचे वाचन
हिंगोली : शहरातील पेन्शनपुरा येथील एका विद्यार्थ्याने एकाच वेळी संपूर्ण कुराण वाचन करण्याची किमया केली आहे. बुधवारी सकाळी ६ ते ५.४५ वाजेदरम्यान ३० मौलानाच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांने कुराण वाचन केले आहे. हिंगोली शहरातील पेन्शनपुरा येथील मेहराज-उल-उलुम या मदरसामधील दोन विद्यार्थ्यांनी हाफीज-ए-कुराण ही पदवी प्राप्त केली आहे. त्यामधील हाफीज शेख रहेमत शेख मिया यांनी हा पराक्रम केला आहे. उपस्थितांनी हाफीज शेख रहेमत शेख मिया आणि त्याचे गुरू हाफीज सय्यद अफसर यांचा सत्कार केला आहे. सूत्रसंचालन हाफीज खाजा बागवान तर आभार मुफ्ती शफीक यांनी मानले. यशस्वीतेसाठी मौलाना हबीब, हाफीज अय्युब, हाफीज मुनीर आणि मदरसा कमेटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)