शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

वाचन संस्कृती कमी होतेय; विद्यार्थी- ग्रंथालयातील अंतर वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:04 IST

सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते.

औरंगाबाद : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. शाळांमध्ये तर या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त केलेल्या सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते.

२०१५ पासून हा दिवस साजरा केला जातो. १५ ते २२ आॅक्टोबर हा कालावधी वाचन प्रेरणा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. डॉ. कलाम यांच्या पुस्तकांसोबतच इतर लेखकांची प्रेरणादायी पुस्तके शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांनीही या पुस्तकांचे वाचन करावे, असे या दिनानिमित्त अपेक्षित आहे. 

वाचन पे्ररणा दिनानिमित्त डॉ. अब्दुल कलाम यांच्याच साहित्याविषयी ‘लोकमत’ने शिक्षण आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले. यामध्ये डॉ. अब्दुल कलाम यांची कोणती पुस्तके आपल्याला माहीत आहेत, याविषयी विचारले असता ९५ टक्के लोकांनी अग्निपंख या एकाच पुस्तकाचे नाव सांगितले. केवळ पाच टक्के लोकांना त्यांच्या इतर पुस्तकांची नावे सांगता आली. अग्निपंख हे पुस्तक आपण वाचले आहे का? या प्रश्नाचे उत्तर ६० टक्के लोकांनी हो असे दिले. ८० टक्के लोकांना अग्निपंखव्यतिरिक्त डॉ. कलाम यांची इतरही अनेक पुस्तके आहेत, हे माहीत नाही. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियावर शेअर केले जाणारे लेख आपण आवर्जून वाचतो. पण पुस्तक विकत घेऊन किंवा गं्रथालयातून आणून किंवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अ‍ॅपवरून डाऊनलोड करून खूप दिवसात वाचले नसल्याचे अनेक तरुणांनी सांगितले.

सादिलवार खर्च बंद झाल्याने अडचणपूर्वी शाळांना सादिलवार खर्च दिला जायचा. या खर्चातून शाळेत पुस्तकांची खरेदी के ली जायची. पण आता हा खर्च देणे बंद केल्यामुळे अनेक शाळांसाठी अभ्यासक्रमासंबंधी पुस्तके घेण्याचीच वानवा असताना अवांतर वाचनाची पुस्तके घेणे फार दूरची गोष्ट झाली आहे. यामुळेही विद्यार्थी आणि ग्रंथालयांचे अंतर शालेय जीवनापासूनच वाढू लागले असल्याची खंत काही साहित्यिकांनी व्यक्त केली.

वाचन टिकले तर संस्कृती टिकेल

केवळ विद्यार्थीच नव्हेतर एकंदरीत सर्वच समाजाचे वाचन कमी झाले आहे. आमच्या पिढीला शालेय जीवनापासून कथा, कादंबऱ्या वाचायची सवय होती, पण आता तर महाविद्यालयातील विद्यार्थीच काय, पण प्राध्यापकांनीही या कादंबऱ्यांचे वाचन केलेले नाही. मातृदिन, पितृदिन आणि आता वाचन पे्ररणा दिन, असे एक दिवसापुरते आपण सगळे मर्यादित करून टाक ले आहे. पण या दिनानिमित्त अंतर्मुख होऊन पाच टक्के लोकांना जरी वाचनाची प्रेरणा मिळाली तरी समाजात वाचन संस्कृती पुन्हा एकदा रुजू होऊ शकेल आणि वाचन टिकले तरच संस्कृती टिकेल.- प्रतापराव बोराडे, प्राचार्य 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीliteratureसाहित्य