३०० कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:23 IST2017-08-31T00:23:17+5:302017-08-31T00:23:17+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्षानुवर्षे काम करणाºया ३०० कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल २००९ पासून पडून आहेत. त्यातील २८ जणांचे गोपनीय अहवाल गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

३०० कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्षानुवर्षे काम करणाºया ३०० कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल २००९ पासून पडून आहेत. त्यातील २८ जणांचे गोपनीय अहवाल गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विभागप्रमुखाला दरवर्षी आपल्या विभागातील कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल आस्थापना विभागाला सादर करावे लागतात. मागील नऊ वर्षांपासून आरोग्य विभागाचे अहवाल आस्थापना विभागाला पोहोचलेच नाहीत, तर प्रशासनानेही याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही.
महापालिकेतील प्रत्येक विभागप्रमुखाला आपल्या विभागातील कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल लिहून प्रशासनाकडे पाठवावे लागतात. या अहवालावरून कर्मचाºयांची पदोन्नती, १२ आणि २४ वर्षांची वेतनश्रेणी आदी आर्थिक लाभ मिळत असतात. ज्या कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल अत्यंत खराब असतात, त्यांना कोणतेही आर्थिक फायदे मिळत नाहीत. मनपाच्या आरोग्य विभागात सुमारे ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. वर्ग-२ आणि वर्ग-३ मधील या कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल २००९ पासून प्रशासनाकडे पाठविण्यात आलेले नाहीत. आरोग्य विभागातच हे अहवाल पडून आहेत. यातील २८ कर्मचाºयांचे अहवाल गायब झाल्याचेही समोर आले आहे. कर्मचाºयांना आपला गोपनीय अहवाल वरिष्ठ अधिकाºयांकडूनच लिहून घेता येतो. दुसºया विभागाच्या वरिष्ठांना तो अहवाल लिहिण्याचा अजिबात अधिकार नाही. २००९ पासून ज्या कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल आरोग्य विभागात अडवून ठेवण्यात आले आहेत, ते कर्मचारी सध्या हवालदिल झाले आहेत. भविष्यात मनपाला नवीन आरोग्य वैद्यकीय अधिकारी लाभल्यावर ते कर्मचाºयांचे जुने गोपनीय अहवाल लिहू शकणार नाहीत. मागील नऊ वर्षांपासून गोपनीय अहवाल अडवून ठेवणाºयांची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे.