शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जायकवाडी धरणातून गोदापात्रात पुन्हा विसर्ग; १६ दरवाजे ६ इंचाने उघडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 18:20 IST

गोदाकाठच्या नागरिकांना इशारा

ठळक मुद्देमहिनाभरापूर्वी उघडले होते दरवाजे गोदावरी पात्रात ९९७३  क्युसेक विसर्ग

पैठण : रविवारी सायंकाळी धरणातील जलसाठा १०० टक्क्यांकडे आगेकूच करीत असताना धरणात येणारी आवक १७ हजार क्युसेकपर्यंत वाढल्याने धरणाचे १६ दरवाचे सहा इंचाने वर उचलून गोदावरी पात्रात ९९७३  क्युसेक विसर्ग करण्यात आला. धरणात येणारी आवक वाढली तर त्या प्रमाणात धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात येईल, असे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान पाणी सोडताना धरणाचा जलसाठा ९८ टक्के राखला जाईल, असे धोरण जायकवाडी प्रशासनाने कायम केले असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.  जलक्षमता१५२२ फूट असलेल्या जायकवाडी धरणाचीपाणीपातळी ही १५२१.९३ झाल्याने धरणातून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अधीक्षक अभियंता म्हेत्रे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे  आदींच्या पथकाने धरणाचे दरवाजा क्रमांक १०, २७, १६, २१, १४, २३, १२, २५, ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० अर्धाफूटवर उचलून गोदावरी पात्रात ८३८४ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक इतका असा एकुण ९९७३ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

महिनाभरापूर्वी उघडले होते दरवाजे जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५२१.९३ झाली असून, धरणात एकूण जलसाठा २९००.६८३ दलघमी झाला आहे. यापैकी २१६२.५७७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. यंदा धरणातून १५ आॅगस्ट रोजी दरवाजे उचलून प्रथम पाणी सोडण्यात आले होते. यानंतर रविवारी १५ सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे उचलून परत पाणी सोडण्यात आले आहे.

गोदाकाठच्या नागरिकांना इशाराजायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग वाढवावा लागणार असल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी यंत्रणेमार्फ त  गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद