राऊत, भंडारी म्हणजे सीएम, पक्षप्रमुख नव्हेत

By Admin | Updated: June 24, 2016 01:32 IST2016-06-24T00:37:01+5:302016-06-24T01:32:01+5:30

औरंगाबाद : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून अथवा जाहीरपणे केलेले वक्तव्य म्हणजे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत असू शकत नाही.

Raut, Bhandari is CM, not party chief | राऊत, भंडारी म्हणजे सीएम, पक्षप्रमुख नव्हेत

राऊत, भंडारी म्हणजे सीएम, पक्षप्रमुख नव्हेत


औरंगाबाद : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून अथवा जाहीरपणे केलेले वक्तव्य म्हणजे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत असू शकत नाही. तसेच प्रवक्तेमाधव भंडारी यांनी पक्षाच्या मुखपत्रातून व्यक्त केलेले मत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नाही. असे सांगून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युतीतील सुरू असलेल्या वादावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
खा.राऊ त यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केले. त्याला भंडारी यांनी उत्तर दिले. उद्धव यांनी हे निजामाचे सरकार आहे, असे कुठे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी थेट सेनेला औरंगजेब म्हणून उपमा दिली काय, कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत मते मांडल्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्याला काय दिसते, हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केंद्रातील सरकारला निजामाच्या बापाचे सरकार असल्याची टीका ८ जून रोजी केली होती. त्यावर भाजपकडून शिवसेनेला औरंगजेब असल्याची उपमा देण्यात आली. त्यानंतर प्रवक्ते भंडारी यांनी निजाम आणि औरंगजेब यापलीकडे जाऊन सत्तेतून ‘तलाक’ का घेत नाही, असा सवाल पक्षाच्या मुखपत्रातून शिवसेनेला केला. पंधरवड्यापासून युतीत एकमेकांना उपमा देण्याचा वाद सुरू आहे.
शिवसेनेचे दोनच आमदार
एकच लक्ष; दोन कोटी वृक्ष हे मिशन २ जुलै रोजी राबविण्यात येणार असून, त्याचा आढावा मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्तालयात गुरुवारी घेतला. या बैठकीला मराठवाड्यातील सेनेच्या ११ पैकी आ. पाटील, आ.साबणे हे दोनच सेनेकडून हजर होते.

Web Title: Raut, Bhandari is CM, not party chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.