रेशन दुकानदारांची पुन्हा चौकशी सुरू
By Admin | Updated: July 7, 2014 23:28 IST2014-07-07T23:28:17+5:302014-07-07T23:28:17+5:30
उस्मानाबाद : तांदूळ गैरव्यवहाराबाबत दोषी असलेल्या ३० रास्त भाव दुकानदारांकडून त्यावेळच्या प्रचलित बाजारभावाप्रमाणे धान्याची किंमत वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते.

रेशन दुकानदारांची पुन्हा चौकशी सुरू
राजापूर : प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम करुनदेखील काँग्रेसकडून नेहमी सापत्नभावाची वागणूक मिळते. राष्ट्रवादी काम करत नसल्याचा ठपका ठेवण्यात येतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची मागणी राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान करण्यात आली.
राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची बैठक सोमवारी राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष भरत लाड यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विविध विषयांबरोबरच विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने स्वबळावर लढावे, असा सूर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी लावला. मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून आम्ही वेळोवेळी काँग्रेस उमेदवाराचे काम केले. तरीही या पक्षाकडून राष्ट्रवादीला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले गेले. या सर्व कटू स्मृतिंच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाने स्वबळावर लढलेच पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे उपस्थित बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर १९९९ ची विधानसभा निवडणूक वगळता दोन्ही काँग्रेसने आघाडी करुनच लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजयात दोन्ही काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्या पराभवाच्या सुया एकमेकांकडे रोखीत विधानसभेची निवडणुक स्वतंत्रपणे लढण्याचे वारे वाहू लागले असून राजापूर तालुका राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेवून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)