रेशन दुकानदारांचा कोठडीतील मुक्काम वाढला
By Admin | Updated: July 11, 2016 00:28 IST2016-07-10T23:48:39+5:302016-07-11T00:28:18+5:30
बीड : तालुक्यातील ताडसोन्ना येथील लाखो रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात कारवाईने गती घेतली आहे. या प्रकरणात अटक असलेल्या

रेशन दुकानदारांचा कोठडीतील मुक्काम वाढला
बीड : तालुक्यातील ताडसोन्ना येथील लाखो रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात कारवाईने गती घेतली आहे. या प्रकरणात अटक असलेल्या दोन रेशन दुकानदारांचा कोठडीतील मुक्काम वाढला असून, बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
ताडसोन्ना येथे बोगस रेशन दुकानाला पुरवठा विभागाने डिसेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत धान्याचा पुरवठा केला होता. हा घोटाळा लाखोंच्या घरात असून, या प्रकरणी जून महिन्यात नायब तहसीलदार परवीन पठाण यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात रेशन दुकानदार सज्जन मुंडे व बंकट मुंडे यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी ३० जून रोजी त्यांना अटक केली. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली होती. पोलिसांनी दोन वेळेस वाढीव कोठडी मागितल्यावर न्यायालयाने ती मंजूर केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता १२ जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत आहेत. महत्त्वाचे रेकॉर्ड जप्त केले असून, सखोल तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव म्हणाले. (प्रतिनिधी)