उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड रद्द!

By Admin | Updated: February 7, 2017 22:25 IST2017-02-07T22:20:23+5:302017-02-07T22:25:51+5:30

लातूर :उघड्यावर शौचास बसल्यास रेशनकार्ड रद्द करण्याचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांना दिला जात आहे़

Ration card cancellation if open! | उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड रद्द!

उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड रद्द!

लातूर : ज्यांना जागा नाही त्यांना सार्वजनिक शौचालय व ज्यांना जागा आहे त्यांना शौचालय बांधून देण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोहीम राबविण्यात येत आहे़ या योजनेत सहा हजार लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले. तरीही काही भागांमध्ये लोक उघड्यावर शौचास जातात़ त्याविरूद्ध जनजागृती मोहीम मनपाने सुरू केली असून, उघड्यावर शौचास बसल्यास रेशनकार्ड रद्द करण्याचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांना दिला जात आहे़
स्वच्छ अभियानांतर्गत घरोघरी शौचालयाची सक्ती केली जात असतानाच उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण अद्याप शहरासारख्या भागातही आहे़ शिवाय, शौचालय बांधून देण्याची योजनाही राबविण्यात येत आहे़ लातूर शहरात सहा हजार लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आले़ यातील तीन हजार लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून, दोन हजार लाभार्थ्यांचे प्रगतीपथावर आहे़ एक हजार लाभार्थ्यांनी १५ दिवसात शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे लेखी दिले आहे़ तरीही शहरातील रिंगरोडलगतच्या वस्त्यांमध्ये उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण आहे़ या वस्त्यांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून दररोज सकाळी ५़३० ते ९़०० वाजपेर्यंत गुडमॉर्निंग पथक नजर ठेवून आहे़ जे नागरिक उघड्यावर शौचास जातात त्यांना या अभियानांतर्गत समज दिली जात आहे़ काही नागरिकांना तर दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते़ आता त्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर सुरू केला असला तरी त्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांना अनुदान देण्यासाठी मनपाने प्रस्तावही तयार केले आहेत़ उघड्यावर शौचास गेल्याचे निदर्शनास आल्यास शासनाच्या निर्देशानुसार त्यांचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र जप्त करून रद्द करण्याची कारवाई करण्यासाठी मनपाने तयारी केली आहे़ प्रारंभी त्यांना समजून सांगण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची जनजागृती शहरातील चारीही झोनमध्ये झोनप्रमुखांमार्फत सुरू असल्याचे मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले़

Web Title: Ration card cancellation if open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.