परभणीत फुलांचे दर दुपटीने वाढले
By Admin | Updated: September 4, 2014 00:19 IST2014-09-04T00:17:43+5:302014-09-04T00:19:29+5:30
परभणी : महालक्ष्मींचा सण आणि गणेशोत्सव यामुळे फुलांची मागणी वाढली असली तरी बुधवारी लक्ष्मीपूजनामुळे परभणीच्या बाजारात फुलांचे दर दुपटीने वाढल्याचे पहावयास मिळाले़

परभणीत फुलांचे दर दुपटीने वाढले
परभणी : महालक्ष्मींचा सण आणि गणेशोत्सव यामुळे फुलांची मागणी वाढली असली तरी बुधवारी लक्ष्मीपूजनामुळे परभणीच्या बाजारात फुलांचे दर दुपटीने वाढल्याचे पहावयास मिळाले़
मराठवाड्यात जूनपासून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने फुलांची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली नाही़़ त्यामुळे बाजारात फुलांची आवक झाली नाही़ आता सणाचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र फुलांची आवश्यकता असते़ याकरिता विक्रेत्यांना थेट परराज्यातून फुलांची मागणी करावी लागत आहे़ महालक्ष्मी सणानिमित्तही शहरातील फूलविक्रेत्यांनी थेट हैदराबादहून शेवंती, निशीगंध, गुलाब, लिली, मोगरा, अस्टर आदी फुलांची आयात केली होती़ बुधवारी महालक्ष्मींचे पूजन असल्याने फुलांची मागणी वाढली़ त्यामुळे फुलांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले़ १०० रुपयांना मिळणारे फुलांचे हार चक्क २०० रुपयांनी विकले गेले़ परभणीच्या बाजारात बुधवारी ५०० रुपयांपर्यंत हार विक्रीसाठी उपलब्ध होते़ काही विक्रेत्यांनी नांदेड येथूनही फुले आणून बाजारात विकले़ वाढलेल्या मागणीचा फटका मात्र शहरवासियांना सहन करावा लागला़ (प्रतिनिधी)