राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत ऋतुजाला कास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:27 IST2018-02-09T00:27:34+5:302018-02-09T00:27:50+5:30
सोलापूर येथील सिंहगड महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा मुंबरे हिने कास्यपदक जिंकले. या कामगिरीबद्दल तिचा देवगिरी महाविद्यालयातर्फे स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत ऋतुजाला कास्य
औरंगाबाद : सोलापूर येथील सिंहगड महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा मुंबरे हिने कास्यपदक जिंकले. या कामगिरीबद्दल तिचा देवगिरी महाविद्यालयातर्फे स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य रजनीकांत गरुड, उपप्राचार्य संभाजी कमानदार, उपप्राचार्य प्रदीप सोळुंके, क्रीडा विभागप्रमुख एकनाथ साळुंके, प्रा. रणजित पवार, प्रा. गणेश बेटुदे, शेख रफिक उपस्थित होते. राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कास्यपदक जिंकणाºया ऋतुजा मुंबरे हिला राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, राष्ट्रीय खेळाडू स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे, संजय भूमकर आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.