शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ‘रॅश ड्रायव्हिंग’वाढले; सलग दुसऱ्या दिवशी भरधाव कार वाहतूक बेटाला धडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:12 IST

सलग दोन घटनांमध्ये भरधाव कार वाहतूक बेटांना धडकल्या, सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही

औरंगाबाद: अमरप्रीत चौकात बुधवारी रात्री भरधाव वेगाने जाणारी कार बॅरिगेट्स आणि वाहतूक बेटाला धडकल्याची घटना घडल्यानंतर गुरूवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिरासमोरील वाहतूक बेटाला वेगाने जाणारी कार धडकली. सलग दुसऱ्या दिवशी ‘रॅश ड्रायव्हिंग’च्या घटना शहरात घडल्या आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री सेव्हन हिल्सकडून सूतगिरणीकडे एक कार ( क्रमांक एमएच-०३, एझेड- ४४०६ ) भरधाव वेगात जात होती. गजाजन महाराज मंदिरासमोरील वाहतूक बेटाला या भरधाव वेगातील कारने धडक दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कारचालक अपघातानंतर फरार झाला. कारमध्ये कोण होते, चालक मद्यपान केलेला होता की नाही. याची खातरजमा केल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे घटनास्थळावरील पोलिसांनी सांगितले. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

सलग दोन घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान जालना रोडवरील अमरप्रीत चौकात एका भरधाव वेगातील कार रस्त्यावरील बॅरिगेट्स आणि वाहतूक बेटाला धडकल्याची घटना घडली होती. अपघातानंतर कार तेथून निघून गेली. कोणती कार होती? कोणी जखमी झाले का ? याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस शहरात ‘रॅश ड्रायव्हिंग’च्या घटनेतून मोठे अपघात घडले. तसेच गुरुवारी सकाळी वाळूज येथे भरधाव ट्रकने तिघा भावंडाना चिरडले होते. शहरात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नागरीकांमधून चिंता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात