'रास दांडिया' जल्लोषात
By Admin | Updated: October 22, 2015 21:01 IST2015-10-22T21:01:19+5:302015-10-22T21:01:19+5:30
औरंगाबाद शहरात एवढा भव्य दांडिया प्रथमच आयोजित करण्यात आला. हजारो उत्सवप्रेमी नागरिकांना कुटुंबासह गरब्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'लोकमत'चे आभार.

'रास दांडिया' जल्लोषात
औरंगाबाद शहरात एवढा भव्य दांडिया प्रथमच आयोजित करण्यात आला. हजारो उत्सवप्रेमी नागरिकांना कुटुंबासह गरब्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'लोकमत'चे आभार.
- अरुण मुनोत, संचालक, राजवीर इन्फ्रा औरंगाबाद : सायंकाळची वेळ, वाढता जोश आणि आकर्षक पारंपरिक पोशाखात न थकता न थांबता संगीताच्या तालावर थिरकणारे हजारो दांडियाप्रेमी, असे दृश्य काल प्रोझोन मॉलच्या हिरवळीवर पाहायला मिळाले. अशा जल्लोषपूर्ण वातावरणात 'लोकमत' आणि 'प्रोझोन' प्रस्तुत व 'ऑब्सेशन ग्रुप'तर्फे आयोजित 'रास दांडिया -२0१५' बुधवारी संपन्न झाला. या दांडिया महोत्सवाच्या प्रारंभी शक्तिस्वरूप दुर्गामातेची आरती करण्यात आली. नंतर मग भक्तिगीते आणि बॉलीवूड गाण्यांच्या फ्यूजनमध्ये औरंगाबादकरांनी हळूहळू ठेका धरायला सुरुवात केली.
केवळ तरुणच नाही तर आबालवृद्धांनी टिपर्या खणकावत रात्री उशिरापर्यंत गरबा आणि दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. रात्र जसजशी पुढे सरकत होती, तशी दांडियाप्रेमींची ऊर्जा वाढू लागली. दांडिया महोत्सवाचा बुधवारी शेवटचा दिवस होता.
पुढच्या वर्षी याच उत्साहाने पुन्हा दांडिया खेळू, गरब्याच्या गिरक्यात धुंद होऊ अशी इच्छा महोत्सवाच्या शेवटी सर्वांनीच व्यक्त केली. शहरातील दांडियाप्रेमींच्या उदंड प्रतिसादात शहरातील सर्वांत मोठय़ा रास दांडियाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे प्रायोजक राजवीर इन्फ्रा, क्रीम सेंटर व सिग्मा हॉस्पिटल तर सोनपरी गोल्ड गिफ्ट पार्टनर होते.