शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रॅपर राज मुंगासेचा शोध लागला; अटकपूर्व जामीन मिळाल्याची अंबादास दानवेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 15:08 IST

विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: “ ५०खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” असे बोल असलेले रॅप सध्या तुफान व्हायरल झाले आहे. मात्र, याचा निर्माता रॅपर राज मुंगासेला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शिंदे गटाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून रॅपर राज कुठे आहे याची माहिती नव्हती. पोलिसांनी अटक केली असेल तर तो कोणत्या ठाण्यात आहे याची माहिती मिळत नसल्याने राजच्या नातेवाईकांनी देखील याबाबत काळजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज फेसबुकवर रॅपर राजसोबत फोटो शेअर करत कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रॅपर राजचा “ ५०खोके घेऊन चोर आले”  हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे अल्पवधीतच तो लोकप्रिय झाला. मात्र, या गाण्यातून शिंदे गटाची, आमदारांची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्यावतीने रॅपर राज मुंगासेवर अंबरनाथ येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून राज गायब होता. कधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तर कधी जालना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची चर्चा होती. त्याच्या अटकेची अधिकृत माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांसह अनेक राजकीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. यावरून शिंदे-भाजप सरकारला टीकेचे लक्ष करण्यात आले आहे.  

कल्याण न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनअखेर रॅपर राज मुंगासेचा शोध लागला आहे. आज विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी राज याला कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केल्याची माहिती दिली. राज्यात सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे गुन्हा आहे. युवकांवर, कलाकारांवर गुन्हा दाखल करून तरुणांचे भविष्य हे सरकार उद्ध्वस्त करत आहे, आम्ही यांच्या पाठीशी सर्व ताककदीनिशी उभे असू, अशी ग्वाही देखील दानवे यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया