शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Rapper Raj Mungase: इतक्या दिवस का लपून राहिला? रॅपर राज मुंगासे मीडियासमोर आला, मोठा खुलासा केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:04 IST

Rapper Raj Mungase: 50 खोके अन् गुवाहाटी, यावर रॅप बनवणारा छत्रपती संभाजीनगरमधील रॅपर राज मुंगासे आज माध्यमांसमोर आला.

छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी रॅपर राज मुंगासे यांने राज्यातील राजकीय परिस्थिती सांगणारे रॅप सॉन्ग तयार केले होते. या रॅपमध्ये त्याने '50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी' अशा शब्दांचा वापर केला होता. त्याचे हे रॅप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना(उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी शेअर केल्यानंतर राज्यभर तुफान व्हायरल झाले. मात्र, यानंतर त्याच्याविरोधात अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यापासून राज गायब झाला होता. तो नेमका कुठंय, याची माहिती कोणलाही नव्हती. अखेर त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो माध्यमांसमोर आला. अंबादास दानवे यांनीच आज फेसबुकवर राजसोबत फोटो शेअर करत कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे.

काय म्हणाला राज मुंगासे?माध्यमांसमोर आलेल्या राजने सांगितले की, त्याला अटक झाली नव्हती. त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता, त्यानंतर पोलीस त्याच्या घरीही गेले होते. तो रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, अशाप्रकारे त्यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचेही त्याने सांगितले. पण मी त्या व्हिडीओमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही, कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही. तुम्ही 50 खोके घेतलेच नसतील तर तुम्ही ते स्वत:वर ओढून का घेत आहात? मी फक्त ‘चोर’ असा उल्लेख करत गाणं बनवलंय. त्यामुळे तुम्ही चोर असाल, तर ते गाणं तुमच्या मनाला लागणं सहाजिक गोष्ट आहे, असं राज म्हणाला. 

राज पुढे म्हणाला की, एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याने अंबादास दानवे यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर दानवेंनी त्यांच्या वकिलाचा नंबर दिला आणि त्यांनीच राजला मदत केली. त्या दिवसापासून राज मुंगासे अंडरग्राऊंडच होता. त्याने आई-वडिलांनाही कुठे जातोय, याची माहिती दिली नव्हती. तो पुढे म्हणाला की, पोलीस ताब्यात घेतील याची भीती होती. अटकपूर्वी जामीन करायचा होता आणि त्या काळात तीन दिवस सुट्टी होती, म्हणून लपून राहावं लागलं, असा खुलासा राज मुंगासे याने केला.

अंबादानस दानवेंचा पोलिसांना इशाराशिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजला सर्व मदत केली आहे. जामीन झाल्यानंतर तेच राजला मुंबईवरुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आपल्या गाडीतून घेऊन येत आहेत. माध्यमांशी बोलताना राज मुंगासे याला पोलिसांनी त्रास देऊ नये असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे. राज याने कुठलाही गुन्हा केलेला नाही. कुठतरी गुन्हा दाखल झाला म्हणून त्याच्यावर पोलिसांनी अन्याय करू नये असेही दानवे यांनी म्हंटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारAmbadas Danweyअंबादास दानवेPoliceपोलिस