शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औषधाच्या बहाण्याने नशेच्या गोळ्या चारत विभक्त पत्नीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:08 IST

याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.

सिल्लोड (औरंगाबाद) : चार वर्षांपासून पतीपासून विभक्त असलेल्या पत्नीला नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याप्रकरणी पतीविरुद्ध सिल्लोड शहर पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ डिसेंबरच्या रात्री पीडित महिलेच्या घरी घडली.

पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेख फराज याच्याशी आपला २५ मे २०१७ रोजी औरंगाबाद येथे विवाह झाला. लग्न झाल्यावर सहा महिने सर्वकाही चांगले चालले. त्यानंतर सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. यासंदर्भात महिलेने सासरच्या लोकांविरुद्ध मनमाड येथे सन २०१८ मध्ये शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्यादही दिली होती. त्यावरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हेही दाखल झाले होते. तेव्हापासून ती सिल्लोड येथे वडिलांच्या घरी विभक्त राहू लागली. ४ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजता पीडिता घरी एकटीच होती. 

याच दरम्यान, पती शेख फराज हा तेथे गेला, तिचे डोके दुखत होते म्हणून त्याने पत्नीला डोक्याच्या म्हणून नशेच्या गोळ्या दिल्या व तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. ५ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता तिची नशा उतरल्यावर या दोघांत भांडण झाले. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी तिने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज करीत आहेत.

गोळी देण्याच्या बहाण्याने गेला घरीफिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी असून, त्यांच्यात पटत नसल्याने ते एकमेकांपासून वेगळे राहतात. आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन डोक्याची गोळी देण्याच्या बहाण्याने फिर्यादीस नशेची गोळी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तसेच तिला शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- अशोक मुदिराज, पोलिस निरीक्षक, सिल्लोड शहर.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद