शिवणगाव येथे लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार
By Admin | Updated: August 13, 2014 00:47 IST2014-08-13T00:41:10+5:302014-08-13T00:47:23+5:30
उमरी : लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने एका मुलीशी सतत दोन वर्षे अनैतिक संबंध ठेवून लग्नास नकार दिला. या प्रकरणी सदर तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक झाली आहे.

शिवणगाव येथे लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार
उमरी : लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने एका मुलीशी सतत दोन वर्षे अनैतिक संबंध ठेवून लग्नास नकार दिला. या प्रकरणी सदर तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक झाली आहे.
शिवणगाव येथील संतोष बालाजी मिटके (वय २३) याने घराच्या शेजारील एका मुलीशी भूलथापा देवून लगट केली. वीस वर्षे वय असलेली मुलगी शाळेला जात असताना आरोपी संतोष हा तिच्या मागे लागला. दोन वर्षापूर्वी हे प्रकरण सुरु झाले. मुलीच्या घरी व आरोपीच्या शेतात नेवून बलात्कार केला. शेवटी हे प्रकरण वाढत गेले. आपण लग्न करु म्हणून त्यास मुलीने विनंती केली. मात्र सदर आरोपीने लग्नास नकार देवून तिला मारहाण केली. ही घटना १० आॅगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडली. यामुळे आपली व परिवाराची समाजात बदनामी होईल या भितीने मुलीने विषारी द्रव्य पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले असून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक एम. ए. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि फारुख खान हे करीत आहेत. (वार्ताहर)
गणवेश वाटप
कुंटूर : राहेर जवळील तोरणा येथील जि.प. प्रा. शाळेत सर्व शिक्षा अभियानातंर्गंत गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शा.व्य.स.चे अध्यक्ष नरवाडे केशव पाटील, श्रीराम हिवराळे, सोनकांबळे, हैबते, देवराव पाटील, बालाजी हिवराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मु. अ. एस.ए. चौधरी, शिक्षक हासगुळे, केंद्रप्रमुख लोलमवाड यांनी केले.