पतीविरुद्ध नोंदविला बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:02 IST2021-05-22T04:02:12+5:302021-05-22T04:02:12+5:30

औरंगाबाद : इच्छा नसताना पत्नीवर बळजबरी करून वारंवार तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध पीडित पत्नीने थेट पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदविली. ...

Rape reported against husband | पतीविरुद्ध नोंदविला बलात्काराचा गुन्हा

पतीविरुद्ध नोंदविला बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद : इच्छा नसताना पत्नीवर बळजबरी करून वारंवार तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध पीडित पत्नीने थेट पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदविली. आरोपी पतीने लग्नानंतर सासरी नांदवण्यास नेले नाही. उलट खोली किरायाने घेऊन त्याने तिच्यासोबत १४ वर्षे संसार केला आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

पीडिता आणि आरोपी व्यक्तीमध्ये २००७ पासून प्रेमसबंध होते. यातून लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. यामुळे तिला अनेकदा गर्भधारणा झाली. गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तो तिचा गर्भपात करायचा. यातच तिला पुन्हा दिवस गेल्यावर त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने त्यास नकार दिला. यामुळे शेवटी त्याने तिच्यासोबत नोंदणीकृत आंतरधर्मीय विवाह केला. तो तिला घेऊन स्वतःच्या घरी न जाता स्वतंत्र खोली किरायाने घेऊन राहत होता. दरम्यान त्याने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, तिने नकार दिला. तिने एका मुलीला जन्म दिला. आम्हाला सासरी नांदवण्यास घेऊन जा, असा तिचा आग्रह होता. त्याने मात्र तिला त्याच्या आई- वडिलांच्या घरी पाऊल ठेवू दिले नाही. उलट तो तिला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. त्रास असह्य झाल्यावर पीडितेने गुरुवारी वेदांतनगर ठाणे गाठून पतीविरुद्ध बलात्कार करणे, बेकायदा गर्भपात करणे आणि छळाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Rape reported against husband