मेहुण्याच्या पत्नीवर बलात्कार,गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 20, 2014 00:27 IST2014-07-20T00:11:23+5:302014-07-20T00:27:26+5:30
लोहा : तालुक्यातील पोखरभोसी येथे वर्षभरापासून जिवे मारण्याची धमकी देत मेहुण्याच्या एकोणवीस वर्षीय पत्नीवर लैंगिक अत्याचार केले व सासू, दीर व नणंदेने आरोपीस पाठीशी घातल्याने गुन्हा नोंद आहे़

मेहुण्याच्या पत्नीवर बलात्कार,गुन्हा दाखल
लोहा : तालुक्यातील पोखरभोसी येथे वर्षभरापासून जिवे मारण्याची धमकी देत मेहुण्याच्या एकोणवीस वर्षीय पत्नीवर लैंगिक अत्याचार केले व सासू, दीर व नणंदेने आरोपीस पाठीशी घातल्याने लोहा पोलिसांत चौघांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
पोखरभोसी येथील राजेश याचा गतवर्षी नांदेड येथील तरुणीशी विवाह झाला होता़ घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पैसे कमावण्यासाठी राजेश याने पत्नीस गावी आई-वडिलांकडे ठेवून पुण्याला गेला व तेथे तो वेठबिगारीचे काम करू लागला़ त्याची पत्नी पोखरभोसी येथे नांदत होती़ मात्र राजेशच्या बहिणीचा पती गणपत शंकर गायकवाड याने ३ जुलै २०१३ पासून आषाढ सणाच्या दोन दिवस अगोदरपर्यंत जवळपास वर्षभर सदर विवाहितेस तुला व तुझ्या आई-वडिलांना जिवे मारतो असे धमकावून विवाहितेच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर अत्याचार केले़ विवाहितेने सदर घटना विठाबाई रामा सूर्यवंशी (सासू), छबुबाई गणपत गायकवाड (नणंद) व पुंडलिक रामा सूर्यवंशी (दीर) यांच्या कानावर घातली़ मात्र सदर मंडळीने आरोपीला समज देण्याऐवजी फिर्यादी महिलेस जिवे मारण्याची धमकी दिली व आरोपीस पाठीशी घातले़ यामुळे अत्याचारग्रस्त पीडित विवाहितेने लोहा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली़
याप्रकरणी लोहा पोलिसांत आरोपी गणपत शंकर गायकवाड (नंदवई), छबुबाई गणपत गायकवाड (नणंद), विठाबाई रामा सूर्यवंशी (सासु) व पुंडलिक रामा सूर्यवंशी (दीर) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक अरूण बस्ते करीत आहेत़ (वार्ताहर)