परळीत विवाहितेवर डांबून बलात्कार
By Admin | Updated: May 9, 2014 00:18 IST2014-05-09T00:18:22+5:302014-05-09T00:18:43+5:30
केज : तालुक्यातील शिरुर येथील एका विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली.

परळीत विवाहितेवर डांबून बलात्कार
केज : तालुक्यातील शिरुर येथील एका विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी केज ठाण्यात मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. विठ्ठल कुंडलिक मुंडे, लक्ष्मी कुंडलिक मुंडे (दोघे रा. शिरुर ता. केज) व सोमनाथ (पूर्ण नाव समजू शकले नाही रा. डाबी ता. परळी) यांच्याविरुद्ध फिर्याद आहे. आॅक्टोबर २०१३ पासून लग्नाचे आमिष दाखवून कारमधून पळवून नेत परळी येथे एका घरात डांबून बलात्कार केल्याची फिर्याद पीडित महिलेने केज ठाण्यात दिली. विठ्ठल मुंडे हा जनावरांचा डॉक्टर आहे. त्याने इतर दोघांच्या मदतीने कुकर्म केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी फरार असून तपास सहायक निरीक्षक निंगदळे करत आहेत.दरम्यान, आरोपी फरार असून पथके त्यांचा शोध घेत असल्याचे निंगदळे म्हणाले. (वार्ताहर)