भातोड्यात विवाहित तरुणीवर बलात्कार
By Admin | Updated: April 14, 2015 00:38 IST2015-04-14T00:38:01+5:302015-04-14T00:38:01+5:30
जालना : विवाहित तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील भातोडी गावाजवळ घडली. याप्रकरणी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात आरोपी पवन संतोष चव्हाण (रा. भातोडा)

भातोड्यात विवाहित तरुणीवर बलात्कार
जालना : विवाहित तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील भातोडी गावाजवळ घडली. याप्रकरणी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात आरोपी पवन संतोष चव्हाण (रा. भातोडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सदर विवाहित तरूणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी घरात एकटी असताना आरोपी पवन हा १२ एप्रिल रोजी रात्री घरी आला.
त्याने आपणास चापटबुक्क्याने मारून बळजबरीने मोटारसायकलवर बसविले व आंबेगाव ते घोडेगाव शिवारात नेऊन बलात्कार केला, असे नमूद केले आहे.
याप्रकरणी तपास पोलिस जमादार नाटकर हे करीत आहेत. (प्रतिनिधी)