विवाहितेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:05 IST2021-01-22T04:05:12+5:302021-01-22T04:05:12+5:30

करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी औरंगाबाद : घरात घुसून विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शनिवारपर्यंत (दि. २३) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ...

Rape of a married woman | विवाहितेवर बलात्कार

विवाहितेवर बलात्कार

करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

औरंगाबाद : घरात घुसून विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शनिवारपर्यंत (दि. २३) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी गुरुवारी दिले.

आरोपीचे नाव गजानन कैलास पुरी ( ३७ , रा. ता. फुलंब्री) असे आहे.

२५ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार, २०१३ यावर्षी पीडितेचे लग्‍न झाले. तिला दोन मुलं आहेत. १६ जानेवारीला पीडितेचा पती घरी नव्हता. रात्री १० वाजताच्या सुमारास आरोपी गजानन पुरी हा पीडितेच्या घरात घुसला व बलात्कार केला. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पीडितेचा पती घरी आला असता तिने घडलेली घटना त्याला सांगितली. पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्‍ता मधुकर आहेर यांनी गुन्हा गंभीर असून, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे आहे. गुन्ह्यात आरोपीला आणखी कोणी मदत केली का, याचादेखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

Web Title: Rape of a married woman