रिचार्ज करण्यासाठी आलेल्या मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: March 14, 2016 00:55 IST2016-03-14T00:40:27+5:302016-03-14T00:55:23+5:30
औरंगाबाद : रिचार्ज करण्यासाठी मोबाईल शॉपीवर आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुकानात ओढून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

रिचार्ज करण्यासाठी आलेल्या मुलीवर बलात्कार
औरंगाबाद : रिचार्ज करण्यासाठी मोबाईल शॉपीवर आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुकानात ओढून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना आनंदनगर भागात शनिवारी दुपारी १ वाजता घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून मोबाईल शॉपीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
संघपाल प्रधान (२३, रा. आनंदनगर, भारतनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याचे याच भागात छोटे मोबाईल शॉपीचे दुकान आहे, असे पोलीस निरीक्षक आसाराम जहारवाल यांनी सांगितले. घटनेबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पीडिता आनंदनगर भागातच राहते. तिचे आई-वडील मजुरी करतात. शनिवारी दुपारी पीडिता मोबाईलचे रिचार्ज करण्यासाठी म्हणून आरोपी संघपाल प्रधान याच्या मोबाईल शॉपीवर गेली. तेथे आरोपीने तिला दुकानात ओढून शटर आतून बंद करून घेतले. दुकानातच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शटर बाहेरून लॉक नव्हते. मात्र ते बंद कसे म्हणून स्थानिकांनी गर्दी केली. तेव्हा हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर नागरिकांनी पीडितेची दुकानातून सुटका केली. रात्री आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.