लऊळमध्ये अपंग पुतणीवर बलात्कार
By Admin | Updated: July 20, 2015 00:54 IST2015-07-20T00:19:41+5:302015-07-20T00:54:33+5:30
माजलगाव : अपंग व मनोरूग्ण असलेल्या पुतणीवर चुलत्यानेच बलात्कार केला. ही खळबळजनक घटना रविवारी लऊळ क्र. १ येथे उघडकीस आली.

लऊळमध्ये अपंग पुतणीवर बलात्कार
माजलगाव : अपंग व मनोरूग्ण असलेल्या पुतणीवर चुलत्यानेच बलात्कार केला. ही खळबळजनक घटना रविवारी लऊळ क्र. १ येथे उघडकीस आली.
विश्वंभर महादेव घडसिंग असे नराधमाचे नाव आहे. त्याला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २३ वर्षीय पीडित पुतणीवर त्याने पाच ते सहा वेळेस बलात्कार केला. तिला गर्भधारणा देखील झाली आहे.
तिला आई नसल्यामुळे वडिलच सांभाळ करीत आहेत. मोलमजुरी करण्यासाठी ते दिवसभर बाहेर असत. याचा फायदा घेऊन विश्वंभर घडसिंग हा तिला बिस्कीट, मुरकूलाचे आमिष दाखवून घरात बोलावत असे. पुतणीला गर्भधारणा झाल्यानंतर विश्वंभर घडसिंग हा गायब झाला. त्यानंतर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेने तालुका हादरला आहे. तपास सहायक निरीक्षक शरद जऱ्हाड करीत आहेत. (वार्ताहर)
पीडित तरूणीला आई नाही.
४मनोरूग्ण व अपंग असल्याने तिचा विवाह झाला नव्हता.
४संकटांनी पछाडलेल्या तरूणीला चुलत्यानेच लक्ष्य केले. त्यामुळे नात्याला काळीमा फासला असून संताप व्यक्त होत आहे.