कुंटणखान्यांवर छापा; तीन अंटी अटकेत
By Admin | Updated: January 17, 2016 23:54 IST2016-01-17T23:42:50+5:302016-01-17T23:54:31+5:30
औरंगाबाद : न्यू एसटी कॉलनी आणि अंबिकानगरातील कुंटणखान्यांवर छापा टाकून मुकुंदवाडी पोलिसांनी तीन अंटींना अटक केली. स्वत:च्या व भाड्याच्या घरात या अंटी राजरोसपणे देहव्यापार करीत होत्या.

कुंटणखान्यांवर छापा; तीन अंटी अटकेत
औरंगाबाद : न्यू एसटी कॉलनी आणि अंबिकानगरातील कुंटणखान्यांवर छापा टाकून मुकुंदवाडी पोलिसांनी तीन अंटींना अटक केली. स्वत:च्या व भाड्याच्या घरात या अंटी राजरोसपणे देहव्यापार करीत होत्या. देहविक्रय करणाऱ्या चार महिलांनीही ताब्यात घेतल्याची माहिती फौजदार कल्याण शेळके यांनी दिली.
कमलबाई भालेराव (५२, रा. अंबिकानगर, गल्ली नं. ११), उषा ढगे (३५, रा. न्यू एसटी कॉलनी) आणि मीराबाई गायकवाड (४०, रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी), अशी अटक केलेल्या अंटींची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी (दि.१६) पावणेचार ते सव्वापाच या वेळेत ही कारवाई केली.
मुकुंदवाडीच्या अंबिकानगरातील गल्ली नं. ११ आणि न्यू एसटी कॉलनी या भागात कमलबाई भालेराव, उषा ढगे आणि मीराबाई गायकवाड या अंटी कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नाथा जाधव, सहायक निरीक्षक बेले यांना मिळाली होती. पैसे कमविण्याचे आमिष दाखवून या अंटींनी काही