खंडणीप्रकरणी दोघांविरुद्ध लोहा पोलिसांत गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 10, 2017 00:32 IST2017-07-10T00:30:42+5:302017-07-10T00:32:58+5:30
लोहा : शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य व अन्य एकाविरुद्ध लोहा पोलिसांत रविवारी रात्री खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खंडणीप्रकरणी दोघांविरुद्ध लोहा पोलिसांत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा : लोहा महावितरण कार्यालयातील उपमुख्य कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार करावयाची नसेल तर एक लाख रुपये द्या, असे म्हटल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य व अन्य एकाविरुद्ध लोहा पोलिसांत रविवारी रात्री खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य विठ्ठल संग्रामअप्पा शेटकर व जगदीश अशोक कदम (दोघे रा. सावरगाव न.) यांनी ३० जूनपासून आजपर्यंत लोहा महावितरण कार्यालयाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महेश भीमराव वाघमारे यांना राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या दरबारात तुमची तक्रार करावयाची नसेल तर एक लाख रुपये द्या अन्यथा तुमची तक्रार ऊर्जामंत्री यांच्याकडे करणार असल्याची सक्ती केली.
याप्रकरणी महेश वाघमारे यांनी लोहा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन विठ्ठल शेटकर व जगदीश कदम यांच्याविरुद्ध लोहा पोलिसांत गुन्हा नोंदविला. तपास पोहेकॉ सूर्यवंशी हे करीत आहेत.