ग्रामीण भगिनींच्या राख्या बांधताना जवान गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:01 IST2017-08-13T00:01:47+5:302017-08-13T00:01:47+5:30
‘एक धागा शौर्य का’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील वडगाव गुंधा येथील वडगाव हायस्कूल व जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी तयार करुन पाठविलेल्या पर्यावरणपूरक राख्या देशाचे रक्षण करणाºया शूर जवानांनी बांधल्या

ग्रामीण भगिनींच्या राख्या बांधताना जवान गहिवरले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘एक धागा शौर्य का’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील वडगाव गुंधा येथील वडगाव हायस्कूल व जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी तयार करुन पाठविलेल्या पर्यावरणपूरक राख्या देशाचे रक्षण करणाºया शूर जवानांनी बांधल्या. वडगांवसारख्या ग्रामीण भागातील बहिणींनी पाठविलेला प्रेमाचा धागा बांधताना जवानही गहिवरले.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या उपक्रमात तयार केलेल्या राख्या राखी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर जवानांपर्यंत पोहचल्या. पश्चिम बंगालमधील पानगड येथे सुभेदार मेजर भास्कर ससाणे, पंजाबच्या पठाणकोट येथील एन. एस. जी. कमांडो बाळासाहेब मुंडे व सहकारी तसेच अमृतसर कॅम्प येथील ज्ञानेश्वर बडे व सहकारी आणि बिकानेर येथील १६ मराठा लाईफ इन्फंट्रीमधील विकास जामकर व सहकाºयांनी त्यांना मिळालेल्या राख्या बांधून काढलेले फोटो तितक्याच आत्मियतेने विद्यार्थिनींना
पाठविले.
या उपक्रमाबद्दल भारतीय सैन्यातील अधिकाºयांनी मुख्याध्यापक धनवंत मस्के, बाळासाहेब डोंगरदिवे, सहशिक्षक श्रीहरी येडे, ज्ञानेश्वर कोटुळे, ढवळे, बळीराम घुमरे, संतोष मोरे, शिक्षिका मस्के, शिंदे, जोशी, हंगे, घोडके, विष्णूपंत राऊत, फटाले, नागरगोजे, प्रधान, माने आदींना धन्यवाद दिले.