‘योगेश्वरी’च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

By Admin | Updated: December 3, 2014 01:17 IST2014-12-03T00:53:52+5:302014-12-03T01:17:06+5:30

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर

Range from morning to show Yogeshwari | ‘योगेश्वरी’च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

‘योगेश्वरी’च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा


अंबाजोगाई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. या दरम्यान महोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच महिला व भाविकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. मात्र, रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी या परिसरात निर्माण झाल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू झाला आहे. पहाटे पाच वाजल्यापासून महिला व भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी व सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सेवेसाठी देवल कमिटीच्या वतीने दररोज सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे व शहरात येणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. रस्त्यावरच वाहने लावण्यात येत असल्याने रहदारीत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहे. याचा त्रास भाविकांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. अगोदरच मंडीबाजारातील रस्ते अरूंद असल्याने होणारी ही कोंडी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी माजी उपनगराध्य रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धायगुडे, राजेश गुप्ता, अतुल जाधव, विनोद तापडे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ म्हणाले, वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनांवर दंडात्मक कारवाई करू. (वार्ताहर)

Web Title: Range from morning to show Yogeshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.