रंगनाथ महाराज महापरिनिर्वाण महोत्सव उत्साहात
By Admin | Updated: December 9, 2015 23:49 IST2015-12-09T23:34:47+5:302015-12-09T23:49:23+5:30
जालना : आनंदी आत्मानंद सरस्वती उर्फ रंगनाथ महाराज यांच्या महापरिनिर्वाणास कार्तिक वद्य त्रयोदशीला १०० वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित शताब्दी सप्ताहाची सांगता

रंगनाथ महाराज महापरिनिर्वाण महोत्सव उत्साहात
जालना : आनंदी आत्मानंद सरस्वती उर्फ रंगनाथ महाराज यांच्या महापरिनिर्वाणास कार्तिक वद्य त्रयोदशीला १०० वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित शताब्दी सप्ताहाची सांगता बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी व महाप्रसादाने अपूर्व उत्साहात करण्यात आली. सप्ताहभर विश्रांती मठ परिसर भक्तिमय झाला होता. अध्यक्ष सिद्धीविनायक बोंद्रे यांनी ‘काम, क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरली पायासवे’ या अभंगावर प्रवचन केले.
सप्ताहाचा प्रारंभ ह.भ.प. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करुन करण्यात आली. बुधवारी पहाटेपासून विविध कार्यक्रम पार पडले. यात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण तर रात्री साडेसात वाजता बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन झाले.
आनंदी आत्मानंद सरस्वती रंगनाथ महाराज यांच्या महानिर्वाणास शंभर वर्षे पूर्ण झाली.
रंगनाथ महाराज मराठवाड्यासह विदर्भातील प्रसिद्ध देवस्थान आहे. मंदिरास दीडशे वर्षांचा इतिहास आहे. सोहळ्यास मठाचे अध्यक्ष सिद्धीविनायक बोंद्रे, उपाध्यक्ष अरूण लोखंडे, सचिव डॉ. विश्वनाथ यादव, कोषाध्यक्ष डॉ.रामदास शिंदे, सहसचिव लक्ष्मण कुलकर्णी, विश्वस्त अॅड.मधुकरराव लिंगायत, वर्धमान डहाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, ४५ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे मठाच्या वतीने सांगण्यात आले.