‘रामेश्वर’च्या चेअरमनपदी परिहार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:31 IST2017-08-14T00:31:55+5:302017-08-14T00:31:55+5:30
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विजयसिह परिहार यांची तर व्हाईस चेअरमनपदी दादाराव महाराज राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे़

‘रामेश्वर’च्या चेअरमनपदी परिहार बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विजयसिह परिहार यांची तर व्हाईस चेअरमनपदी दादाराव महाराज राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे़
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडी साठी शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी हरिशचंद्र गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी विजयसिह परिहार यांचा एकमेव तर व्हाईस चेअरमनपदासाठी दादाराव महाराज राऊत यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकºयांनी चेअरमनपदी परिहार तर व्हाईस चेअरमनपदी दादाराव महाराज राऊत हे बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी सहाय्यक निबंधक विनय धोटे, कार्यकारी संचालक एकनाथ कोलते, खा़रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, शिवाजी थोटे, गणेशबापु फुके, प्रकाश गिरणारे, मधुकर तांबडे, प्रभाकर सोनुने, मोतीराम नरवडे, संजय लोखडे, प्रल्हाद चव्हाण, नामदेव लोखडे, गोविदराव पंडीत, आबाराव गायकवाड, सुखदेव गाडेकर, द्वारकाबाई सांडु सिरसाठ, शोभाताई नवाबराव मतकर, सुमनबाई भास्करराव म्हस्के, पंढरीनाथ खरात, सुरेश त्रिंबक दिवटे उपस्थित होते.