रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:42 IST2017-07-25T00:38:02+5:302017-07-25T00:42:45+5:30
बीड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आ. रमेश कदम यांची पोलीस कोठडी संपली.

रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आ. रमेश कदम यांची पोलीस कोठडी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुपारनंतर सीआयडीचे अधिकारी त्यांना मुंबईला घेऊन गेले.
साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या आदेशान्वये ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. त्यासाठी पुणे सीआयडीने आ. कदम यांना बीड न्यायालयासमोर हजर केले. दोन वेळेस त्यांना पोलीस कोठडी दिली. सोमवारी कोठडी संपल्यानंतर न्यायालयात आ. कदम हजर केले. न्या. बी.व्ही. वाघ यांनी आ. कदम यांना ८ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास अधिकारी सीआयडीचे उप अधीक्षक एस.जी. कोरडे यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मुंबई येथील भायखळा कारागृहात परत नेले.