२० दिवसांत रामेगाव हागणदारीमुक्त !
By Admin | Updated: January 25, 2017 23:58 IST2017-01-25T23:55:34+5:302017-01-25T23:58:58+5:30
लातूर : सरकारी योजनांचे लोकसहभाग नसला होत्याचे नव्हते होते, हे आपणास माहीत आहेच.

२० दिवसांत रामेगाव हागणदारीमुक्त !
लातूर : सरकारी योजनांचे लोकसहभाग नसला होत्याचे नव्हते होते, हे आपणास माहीत आहेच. पण जनचळवळींनी एखाद्या योजनेसाठी गावात जागरण केले तर काय होते? हे पाहण्यासाठी औसा तालुक्यातील रामेगाव हे आदर्श उदाहरण आहे. अवघ्या २० दिवसात शासनाच्या हागणदारीमुक्तीला बळ देऊन घरटी शौचालय बांधून घेण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हींगच्या राज्यभरातून आलेल्या युवाचार्यांनी कंबर कसली. शासनाच्या १२ हजारात आर्ट आॅफ लिव्हींगने स्वत:चे दीड हजार घालून साडेतेरा हजार रुपयात उभे केलेले शौचालयांचा दर्जा पाहिल्यास सामाजिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार २१ हजाराच्या बांधकाम मूल्यातही न बसणारे आहे, हे विशेष.
जिल्हा परिषद आणि स्वच्छ भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गावागावांत शौचालय बांधणीचे काम चालू आहे. मात्र सरकारी काम आणि सहा महिने थांब अशीच अवस्था लोकसहभाग नसल्याने अनेक ठिकाणी आहे. औसा तालुक्यातील रामेगाव मात्र याला अपवाद. ४०० घरे असलेल्या या गावात फक्त ४० शौचालये होती. म्हणजे १० टक्के. शासनाची योजना असूनही लोकांचा सहभाग नव्हता. ही बाब गावात असलेल्या आर्ट आॅफ लिव्हींगचे साधक मकरंद जाधव यांनी हेरली. अनुदानापुरती शौचालये वापरात येत नाहीत. शासनाची अट म्हणून दर्जाहीन शौचालये उभारली जात आहेत, हे ओळखून त्यांनी गावात आपल्या गावात आधी हागणदारीमुक्तीचा करण्याचा संकल्प सोडला.