नाचनवेल सजाचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST2021-07-07T04:05:48+5:302021-07-07T04:05:48+5:30
नाचनवेल : कन्नड तालुक्यातील सर्वात मोठ्या महसूल मंडळांपैकी एक नाचनवेलचा समावेश होतो. परंतु या ठिकाणी तलाठी कायमच गैरहजर राहत ...

नाचनवेल सजाचा कारभार रामभरोसे
नाचनवेल : कन्नड तालुक्यातील सर्वात मोठ्या महसूल मंडळांपैकी एक नाचनवेलचा समावेश होतो. परंतु या ठिकाणी तलाठी कायमच गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या खरीप पीकविमा भरणे, नवीन पीक कर्जासाठी अर्ज करणे, यापूर्वी घेतलेले पीककर्ज नवे-जुने करणे यासारख्या अनेक कृषी संलग्न कामांची लगबग सुरू असताना तलाठी कार्यालय मात्र आपण या गावचेच नाही अशा अविर्भावात वागत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी तलाठी म्हणून अभय शिंदे हे कार्यरत आहे. त्यांच्याकडे नाचनवेल, कोपरवेल, मोहरा व डोंगरगाव सजांचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे की काय ते कोणत्याही गावातील नागरिकांचा फोन घेत नाही. तर त्यांच्या प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे नाचनवेल गावातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.