शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

राजकारण ते अध्यात्म सर्वच क्षेत्रात रामकृष्ण बाबांचा अमीट ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:55 IST

जिल्हा देखरेख संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. सध्याही रामकृष्ण बाबा पाटील हे या बँकेचे संचालक होते.

ठळक मुद्देरामकृष्ण बाबांचा वारकरी संप्रदायाशी घनिष्ठ संबंध राहिला. ते सप्ताहवाले बाबा म्हणूनच ओळखले जायचे.

औरंगाबाद :  समाजकारण, राजकारण, अध्यात्म व सहकार या सर्वच क्षेत्रांत रामकृष्ण बाबा पाटील यांनी अमीट ठसा उमटविला होता. 

३ सप्टेंबर १९३६ रोजी रामकृष्ण बाबा यांचा जन्म दहेगाव, तालुका वैजापूर येथे झाला. ते जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिकले होते; परंतु राजकारणात त्यांचा कायमच दबदबा राहिला. १९७८ ते ८० या काळात ते वैजापूर पंचायत समितीचे सभापती राहिले. १९८५ ते १९९५ पर्यंत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. १९९८ साली ते १२ व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.  वैजापूरच्या विनायक सहकारी साखर कारखान्याचे ते दहा वर्षे अध्यक्ष राहिले. 

रामकृष्ण बाबांचा वारकरी संप्रदायाशी घनिष्ठ संबंध राहिला.  ते सप्ताहवाले बाबा म्हणूनच ओळखले जायचे. ४ डिसेंबर २००० साली रामकृष्ण बाबा हे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.  जिल्हा देखरेख संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. सध्याही रामकृष्ण बाबा पाटील हे या बँकेचे संचालक होते. एक प्रगतिशील शेतकरी असा त्यांचा नावलौकिक होता. रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना महत्त्वाकांक्षी योजना होती. 

धाडसाने निर्णय घेणारा नेतारामकृष्ण बाबा अत्यंत धाडसाने निर्णय घेत असत व तडीस नेत असत.  सर्वसामान्यांचे प्रश्न व जलसिंचनाचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर राहत असे. त्यांनी वैजापूर तालुक्यात व संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले होते. त्यांच्या रूपाने धार्मिक प्रवृत्तीचा एक नेता आपण हरवून बसलो आहोत. -भाऊसाहेब तात्या ठोंबरे,  माजी अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस

शेतीशी नाळ असणारा नेता रामकृष्ण बाबा यांच्या रूपाने शेतीशी नाळ असलेला एक नेता हरपला आहे. राजकारणाशिवाय अध्यात्म या विषयाशी त्यांचे जोडले जाणारे नाव सुपरिचित आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष रामकृष्ण बाबांच्या योगदानाला स्मरून काम करील, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.-डॉ. कल्याण काळे, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस 

ग्रामीण नेतृत्व हरपलेरामकृष्ण बाबा पाटील यांची नाळ ग्रामीण जीवनाशी जुळलेली होती. शेती हा त्यांचा श्वास होता. खऱ्या अर्थाने एक ग्रामीण नेतृत्व होते.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे बाबांना भावपूर्ण आदरांजली.-नितीन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक 

धार्मिक-आध्यात्मिक अधिष्ठानरामकृष्ण बाबा हे धार्मिक-आध्यात्मिक अधिष्ठान असलेले नेते होते. दहेगाव येथे झालेल्या सप्ताहाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांनी त्याकाळी माझी नियुक्ती केली होती. त्यांनी सर्वच क्षेत्रात धडाडीने काम केले होते.-मनसुख झांबड

सिंचन क्षेत्रात  भरीव योगदानरामकृष्ण उपसा जलसिंचन योजना, मन्याड, बोरदहेगाव प्रकल्पासाठी त्यांचे योगदान मोठे राहिले. सरपंच ते खासदारपदापर्यंतची त्यांची वाटचाल सर्वांना थक्क करणारी आहे. त्यांच्या रुपाने एक धर्मनिरपेक्ष नेतृत्व हरपले. -रमेश गायकवाड, जि.प. सदस्य 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण