रामने दिले नाशिककरास जीवदान
By Admin | Updated: January 17, 2016 23:55 IST2016-01-17T23:46:34+5:302016-01-17T23:55:19+5:30
औरंगाबाद : राम मगरच्या लिव्हरमुळे (यकृत) नाशिक येथील लिव्हर सोरासिस झालेल्या ५४ वर्षीय इसमास नवीन आयुष्य मिळाले आहे.

रामने दिले नाशिककरास जीवदान
औरंगाबाद : राम मगरच्या लिव्हरमुळे (यकृत) नाशिक येथील लिव्हर सोरासिस झालेल्या ५४ वर्षीय इसमास नवीन आयुष्य मिळाले आहे. शहरातून शुक्रवारी सकाळी रामचे लिव्हर मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर या रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेच्या दोन दिवसांनंतर हा रुग्ण आता चालू लागला आहे.
एमजीएम रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ग्लोबल हॉस्पिटलचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. रवी मोहंका, लिव्हर सर्जन डॉ. गौरव चौबळ यांनी याविषयी माहिती दिली. राम मगर या अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाचा अपघातामध्ये ‘ब्रेन डेड’ झाला; पण त्याने जाता-जाता तिघांच्या आयुष्याला नवा प्रकाश दिला. त्याच्या दोन किडन्या आणि लिव्हरचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण क रण्यात आले. यामध्ये त्याच्या लिव्हरचे मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ५४ वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. लिव्हर नेण्यासाठी मुंबईहून ग्लोबल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. गुरुप्रसाद शेट्टी व डॉ. गौरव चौबळ शहरात दाखल झाले होते.
पत्रकार परिषदेत डॉ. चौबळ म्हणाले की, लिव्हर कमीत कमी वेळेत नेण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी येथील वरिष्ठ डॉक्टरांसह अनेकांचे सहकार्य मिळाले. चिकलठाणा विमानतळावर थेट प्रवेश मिळाला. त्यातही जवळचा मार्ग वापरल्यामुळे विमान अवघ्या ४५ मिनिटांत मुंबईला पोहोचले.