परभणी,गंगाखेड शहरात रॅली
By Admin | Updated: December 25, 2015 00:02 IST2015-12-24T23:51:44+5:302015-12-25T00:02:17+5:30
परभणी : ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त परभणी शहरातून रॅली काढण्यात आली.

परभणी,गंगाखेड शहरात रॅली
परभणी : ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त परभणी शहरातून रॅली काढण्यात आली. २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निघालेल्या रॅलीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हजरत महंमद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बिलाल मशीद ग्रॅन्ड कॉर्नर येथून रॅली काढण्यात आली. रॅली ग्रॅन्ड कार्नर, आझाद कॉर्नर, शाही मशीद, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, नारायणचाळ, स्टेशनरोड, गांधी पार्क, शिवाजी चौकमार्गे सरकारी दवाखाना येथून इदगाह मैदानापर्यंत काढण्यात आली. रॅलीत मुस्लिम समाज बांधव, सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रेषित महंमद पैंगबर यांची शिकवण व त्यांचा संदेश नागरिकांना समजावा, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मौलाना रफियोद्दीन, मौलाना महिबूल कादरी, माजूलाला, हफीज चाऊस, विखार अहेमद खान, सय्यद महेबूब अली पाशा, परवेज हाश्मी, सय्यद आबूझार, शेख मोबीन, सय्यद गाजी जावेद, अनिस खान, मजीद अन्सारी, हबीब अन्सारी, आझम हुसैन, मुख्य आयोजक अॅड.जावेद कादर, सईद अन्सारी, सिकंदर कोठारी, मुज्जमील खान, शेख शेरु, शोएब बीन सालम, स.हाश्मी, मेहराज कुरेशी, आलीम खान, काजी मुकीम, काजी अखिल, मोहसीन खान, शोएब आदींचा सहभाग होता. रॅलीचा समारोप इदगाह मैदान येथे एका सामूहिक कार्यक्रमाने झाला. रॅलीनिमित्त गावातील मुख्य मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)