राकाँ.जिल्हाध्यक्षांना गावातच धोबीपछाड
By Admin | Updated: November 4, 2015 00:22 IST2015-11-04T00:08:27+5:302015-11-04T00:22:37+5:30
सुखापूरी: ग्रा.पं. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांना त्यांच्या गावातच पराभवाला समोरे जावे लागले.

राकाँ.जिल्हाध्यक्षांना गावातच धोबीपछाड
सुखापूरी: ग्रा.पं. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांना त्यांच्या गावातच पराभवाला समोरे जावे लागले. त्यांच्या पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर प्रतिस्पर्धी पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले.
सुखापुरी ग्रामपंचायत मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निसार देशमुख यांच्या ताब्यात होती. यावेळेस निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये फूट पडली. डॉ. निसार देशमुख यांनी समर्थ ग्रामविकास पॅनल स्थापन करून सर्व ९ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडून राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष रईस बागवान यांनी समर्थ शेतकरी ग्रामविकास पॅनल मार्फत ५ उमेदवार उभे केले होते. तर डॉ. देशमुख यांच्याच संस्थेवरील कर्मचारी काशीनाथ शिंदे व प.स. सदस्य सुभाष पटेकर यांनी सुखाचार्य ग्रामविकास पॅनलची स्थापना करून ६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्यात त्यांचे ५ उमेदवार विजयी झाले. तर डॉ. देशमुख यांच्या पॅनलला १ आणि रईस बागवान यांच्या पॅनलला ३ जागांवर विजय मिळाला. देशमुख यांना त्यांच्या गावातीलच सत्ता कायम ठेवण्यास अपयश आले आहे.