रकूलने सायकलवरून लावली कारसोबत शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:02 IST2021-01-14T04:02:01+5:302021-01-14T04:02:01+5:30

- अभिनेत्री रकूल प्रित सिंह फिटनेस फ्रिक आहे. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओज्‌च्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना देखील व्यायामाचं ...

Rakul raced with his car on a bicycle | रकूलने सायकलवरून लावली कारसोबत शर्यत

रकूलने सायकलवरून लावली कारसोबत शर्यत

- अभिनेत्री रकूल प्रित सिंह फिटनेस फ्रिक आहे. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओज्‌च्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना देखील व्यायामाचं महत्त्व समजावून सांगण्याचा कायम प्रयत्न करते. यावेळी देखील तिने असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रकूल या व्हिडीओमध्ये सायकल चालवताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे सायकलवरून ती कारसोबत शर्यत करत आहे. “आज मी स्वत:च्या क्षमतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतेय. पाहा मी १२ किलोमीटर सायकल चालवली.” अशा आशयाची कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अनुप जलोटा यांचा ‘सत्य साईबाबा’ लूक व्हायरल

गायक अनुप जलोटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी चित्रपट ‘सत्य साईबाबा’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. अनुप यांचा चित्रपटातील लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘तुम्हाला माझा लूक कसा वाटला?’ या आशयाची कॅप्शन दिली आहे. ‘सत्य साईबाबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विकी राणावत यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता अनुप जलोटा यांचा चित्रपटातील लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, गोविंद नामदेव, अरुण बख्शी हे कालाकार देखील भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जाते.

यशराजने तयार केला राखीवर व्हिडीओ

बिग बॉस स्पर्धक राखी सावंतवर रॅपर यशराज मुखातेने एक व्हिडीओ तयार केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये राखी अर्शी खानवर निशाणा साधताना दिसत आहे. ‘ही वेडी कोण आहे, कोणी माझी बाटली फेकली? आहे?, तू तर नाही ना ती? माझी बाटली स्वीमिंग पूलमध्ये कोणी फेकली? ही प्रत्येक फ्रेममध्ये माझी फ्रेम कट करते आहे’ असे राखी सावंत पुढे बोलताना दिसते. यशराजच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Web Title: Rakul raced with his car on a bicycle