राजूरचा आठवडी बाजार गजबजला..!
By Admin | Updated: November 16, 2015 00:36 IST2015-11-15T23:36:49+5:302015-11-16T00:36:37+5:30
राजूर : दिवाळी सणाचा बाजार असल्याने रविवारी राजूरचा आठवडे बाजार गर्दीमुळे फुल्ल झाला होता. दिवाळी सणाची खरेदीची गरज लक्षात घेवून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी

राजूरचा आठवडी बाजार गजबजला..!
राजूर : दिवाळी सणाचा बाजार असल्याने रविवारी राजूरचा आठवडे बाजार गर्दीमुळे फुल्ल झाला होता. दिवाळी सणाची खरेदीची गरज लक्षात घेवून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस व्यापाऱ्यांनी बेभाव खरेदी करून आर्थिक लूट केल्याचे चित्र दिसून आले.
राजूर हे पंचक्रोशितील ३५ ते ४० खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. तालुक्यात सर्वात मोठा भरणारा आठवडे बाजार म्हणून राजूरची ओळख आहे. आज दिवाळी सणाचा बाजार असल्याने बाजारकरुंची मोठी संख्या दिसून आली. बाजारात मोठी गर्दी झाली तसेच मुख्य रस्त्यावर दुकान गजबजल्या होत्या. आज कापड दुकानात महिलांची संख्या अधिक दिसून आली. दिवाळी सणासाठी माहेरी आलेल्या लेकींची बोळवण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाचा सहारा घेतला होता. गेल्या तिन वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थीतीमुळे शेतकरी वर्ग आर्थीक कचाटयात सापडलेला आहे. त्यातच यावर्षीही दुष्काळामुळे उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. काही प्रमाणात आलेला कापूस विकून शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून आज कापसाचे व्यापारी मोठ्या प्रमाणात आले होते.