राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला सिडकोत जोरदार प्रतिसाद
By Admin | Updated: October 6, 2014 00:43 IST2014-10-06T00:28:29+5:302014-10-06T00:43:42+5:30
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला रविवारी सिडकोतील अयोध्यानगर, शिवनेरी कॉलनी, गणेशनगर, एन-७, एन-८ भागांत जोरदार प्रतिसाद मिळाला.

राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला सिडकोत जोरदार प्रतिसाद
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला रविवारी सिडकोतील अयोध्यानगर, शिवनेरी कॉलनी, गणेशनगर, एन-७, एन-८ भागांत जोरदार प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत शेकडो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. राजेंद्र दर्डा यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला.
एन-७ भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने पदयात्रा मोठ्या उत्साहात पुढे निघाली.
इंदिरा मार्केट, ग्रिव्हज कॉलनी, गिडोर कॉलनी, त्रिवेणीनगर भागात पदयात्रा पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. पदयात्रा अयोध्यानगर भागात पोहोचल्यानंतर मुकु ल मंदिर शाळेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
अयोध्यानगर भागातील प्रत्येक गल्लीत पदयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
अनेक महिलांनी आपल्या दारात रांगोळी काढून पदयात्रेचे स्वागत केले. पदयात्रा बजरंग चौकात पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी राजेंद्र दर्डा यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
बजरंग चौक ते जळगाव रोडदरम्यान पदयात्रेत ‘राजेंद्र बाबूजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्याने संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता.
देवगिरी बँकेच्या पाठीमागील भागात श्री हौसिंग सोसायटी, सुयोग हौसिंग सोसायटी, विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, कीर्ती हौसिंग सोसायटी, सद्गुरू हौसिंग सोसायटी भागात पदयात्रेद्वारे मतदानाचे आवाहन करण्यात आले. एन-७ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेत काशीनाथ कोकाटे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. विमल मापारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डीएमआयसीतून औरंगाबादचा विकास
पदयात्रेच्या समारोपप्रसंगी काशीनाथ कोकाटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजेंद्र दर्डा यांनी उद्योगमंत्री असताना डीएमआयसी हा औद्योगिक प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आणला. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील लाखो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भूमिगत गटार योजना असेल, समांतर जलवाहिनी असेल या महानगरपालिकेच्या योजनांसाठीही केंद्रातून निधी मंजूर करण्यात राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा आहे. औरंगाबाद शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजेंद्र दर्डा यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राजेंद्र दर्डा यांना सिडकोतून मोठ्या प्रमाणात लीड देण्याचे आपले कर्तव्य असल्याचे आवाहन काशीनाथ कोकाटे यांनी उपस्थितांना केले.
४कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजेंद्र दर्डा म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:ला उमेदवार समजून काम करावे. आता कुणाचीच हवा नाही, हवा असेल तर ती फक्त काँग्रेसचीच. कुठलाही गटतट न बाळगता एकदिलाने काम करा, विजय आपलाच आहे, असा विश्वास आ. दर्डा यांनी व्यक्त केला.