राजीव सातव ‘संसदरत्न’ने सन्मानित
By Admin | Updated: June 12, 2016 22:52 IST2016-06-12T22:45:32+5:302016-06-12T22:52:26+5:30
खा. राजीव सातव यांना आयआयटी चेन्नईच्या प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने पद्मविभूषण तथा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गर्व्हनर डॉ.सी.रंगराजन यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राजीव सातव ‘संसदरत्न’ने सन्मानित
हिंगोली : सोळाव्या लोकसभेमध्ये प्रथमच निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल खा. राजीव सातव यांना आयआयटी चेन्नईच्या प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने पद्मविभूषण तथा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गर्व्हनर डॉ.सी.रंगराजन यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनिवास आयआयटीचे प्रमुख भास्कर राममुर्ती, भाजपाचे प्रतोद खा. अर्जून मेघावाल उपस्थित होते. प्राईम पॉंईट फाऊंडेशनच्या वतीने लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या लोकसभा सदस्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. सोळाव्या लोकसभेच्या मागील दोन वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊन पहिल्या वेळी निवडून येणाऱ्या खासदारांना दरवर्षी त्यांच्या कामगिरीचे मुल्यांकन करून दिला जाणारा यंदाचा पुरस्कार खा. राजीव सातव यांना देण्यात आला. यासोबतच लोकसभेत विविध गटांतून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिवसेनेचे खा.शिवाजीराव आढळराव पाटील, खा. श्रीरंग बारणे, भाजपाचे खा.पी.पी.चौधरी, खा.हीना गावीत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)