राजीव गांधी यांनी केली विज्ञान-तंत्रज्ञानाची पायाभरणी
By Admin | Updated: May 21, 2016 23:58 IST2016-05-21T23:41:47+5:302016-05-21T23:58:26+5:30
जालना : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी या देशात विज्ञान व तंत्रज्ञानाची पायाभरणी करुन खेडे जगाशी जोडण्याचे काम केले.

राजीव गांधी यांनी केली विज्ञान-तंत्रज्ञानाची पायाभरणी
जालना : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी या देशात विज्ञान व तंत्रज्ञानाची पायाभरणी करुन खेडे जगाशी जोडण्याचे काम केले. या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी शनिवारी येथे केले.
सतकर कॉम्प्लेक्समधील काँग्रेस जिल्हा कार्यालयात स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी स्व. गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव विजय कामड, प्रा. सत्संग मुंढे, प्रदेश महिला कॉँग्रेसच्या विमलताई आगलावे तसेच इकबाल कुरेशी, अब्दुल हफिज, प्रशांत वाढेकर, अंकुशराव राऊत, राम सावंत, अशोक उबाळे, सोनाबाई निकाळजे, अरुण मगरे, संजय खडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डोंगरे म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांनी पंचायतराज संदर्भात घटना दुरुस्ती करुन सत्तेत महिलांना ३३ टक्के वाटा दिला. युवकांना १८ व्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. हे क्रांतीकारी बदल घडवून आणल्यामुळेच स्व. गांधी यांचे कार्य कायम स्मरणात राहिल, असे डोंगरे म्हणाले.
याप्रसंगी दिगंबर पेरे, मंगल खांडेभराड, शामराव लांडगे, मोहन इंगळे, सय्यद गणी, मनोहर उघडे, कृष्णा पडूळ, प्रभाकर निकाळजे, ओम आढे, सुमन निर्मळ, कुमूदिनी पाटोळे, सुरेश ठाकरे, श्रीराम नागरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाढेकर यांनी ेकेले. आभार प्रदर्शन अशोक उबाळे यांनी मानले. (प्रतिनिधी)
पंचायतराज, मतदानाचा अधिकार आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी जगाचे लक्ष वेधले, असे जिल्हाध्यक्ष डोंगरे म्हणाले. खऱ्या अर्थाने या देशातील खेडे विज्ञानाशी जोडल्या गेले. त्यामुळेच या देशात माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडून आल्याचे त्यांनी नमूद केले.