शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राजा भ्रतहरीनाथ नागपंचमी यात्रोत्सव

By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST

उद्धव चाटे, गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथ यांची भस्मसमाधी आहे़

उद्धव चाटे, गंगाखेडतालुक्यातील हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथ यांची भस्मसमाधी आहे़ सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे नागपंचमीनिमित्त भव्य यात्रा महोत्सव आयोजित केला जातो़ या महोत्सवात राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांची उपस्थिती असते़ १ आॅगस्ट रोजी नागपंचमी सणानिमित्त हरंगुळ येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा महोत्सव भरविला जातो़ नागपंचमीनिमित्त यात्रा महोत्सवाचे मोठे धार्मिक महत्त्व आहे़ नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक राजा भ्रर्तहरीनाथ महाराज यांची हरंगुळ येथे वस्त्र व भस्म समाधी आहे़ नागपंचमीच्या दिवशी या समाधीला वारूळ पडते व राजा भ्रर्तहरीनाथ नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक वर्षी साप रुपाने भक्तांना दर्शन देण्याकरीता येतात, अशी अख्यायिका आहे़ त्यांचा अवतार राजा विक्रमादित्य समकालीन आहे़ राजा विक्रमादित्यांनी त्यांना भाऊ समजून राज्यभार दिला म्हणून श्री भ्रर्तहरीनाथांना राजा ही उपाधी प्राप्त झाली़ बरीच वर्षे राज्य केल्यानंतर राज वैभवाचा त्याग करून नाथ संप्रदायाच्या प्रचार व लोककल्याणासाठी तप, तपस्या, तीर्थाटन केले़ तीर्थाटन करीत असताना शेवटी ते गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथे आले व बरीच वर्षे वास्तव्य केल्यानंतर भक्तांना आपल्या अंगावरचे वस्त्र काढून दिले व या गावात समाधी तयार करा, असे सांगितले़ प्रत्येक वर्षी मी पाताळातून साप रुपाने येऊन तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी दर्शन देईल, असे सांगून ते पाताळात निघून गेले़ त्याप्रमाणे आजही हरंगुळ येथे नागपंचमीच्या दिवशी समाधीला वारुळ पाडून ते भक्तांना दर्शन देतात, अशी या मागची अख्यायिका आहे़ पर्यटनस्थळाकडे दुर्लक्ष हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथाची समाधी आहे़ त्यामुळे या गावाला पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे़ परंतु, याकडे दुर्लक्ष असल्याने भक्तांसाठी सोयी, सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे़ शासनाने सोयी, सुविधा द्याव्यात, अशी प्रतिक्रिया नारायण शिंदे, बाळासाहेब कुलकर्णी, बालासाहेब देशमुख, प्रकाश कुलकर्णी, लक्ष्मीकांत जोशी यांनी दिल्या़ नवसाला पावणारे, चमत्कार दाखविणारे कडू लिंबाच्या पानालाही गोड चव देणारे, माती, वाळूची क्षमताही विषारी सापाला दूर ठेऊ शकणारे श्री क्षेत्र हरंगुळ येथे राजा भ्रर्तहरीनाथ यांचे भव्य मंदिर आहे़ श्री राजा भ्रर्तहरीनाथांनी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी तपस्या करून शके १७१० मध्ये हरंगुळ येथे आले होते असे सांगितले जाते़ अनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर ते गुप्त झाले म्हणून येथे नाथाची भस्म समाधी आहे़ या समाधीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह इतर राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात़